ब्‍लॉगबद्दल काही.........

अनेकदा आपल्‍या डोक्‍यात काही तरी विचार सतत चाललेले असतात, कधी ते विचार सहजपणेच येऊन जातात, कधी एका विचाराच्‍या पाठोपाठ अनेक विचार करायला लावणारे विचार येतात. आपल्‍या आजूबाजूस घडणारे प्रसंग, कोणी काही व्‍यक्‍त केलेले, वाचण्‍यात-बघण्‍यात आलेली घटना हे सगळेच आपल्‍याला विचार करण्‍यास भाग पाडतात. कधी ते विचार दोन-तीन दिवस कधी जास्‍त दिवस आपल्‍याला सतावून ठेवतात. त्‍या विचारांचा गंभीरपणा सर्वांनाच जाणवेल असे नाही, ही फार वैयक्तिक बाब आहे तरी असे विचार एकदा मनातून काढून कुठे तरी लिहून टाकले, आपले मन मोकळे केले की जरा बरं वाटतं म्‍हणून हा नवीन ब्‍लॉग..........................